कुपवाड मध्ये जुगार अड्ड्यावर छापा : 2 लाख 18 हजारचा मुद्देमाल जप्त

:  2 लाख 18 हजारचा मुद्देमाल जप्त : पाचजणाविरोधात गुन्हा दाखल

कुपवाड ( प्रमोद अथणीकर)

      कुपवाड परिसरामध्ये आज दुपारच्या च्या सुमारास पोलिसांनी तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 2 लाख 18 हजार 820 इतक्या किमतीचा रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे.

     अधिक माहिती अशी, कुपवाड कवलापूर रोड लगत असणारे अनिल बिरनाळे यांच्या घराच्या आडोशाला महावीर गणपती कांबळे (वय वर्षे 50 )रा. लक्ष्मी मंदिर जवळ, कोंडके मळा बामणोली, मोहन तुकाराम सरगर (वय वर्षे 31) रा मायाका नगर बामणोली, अशोक बाळू कोकरे (वय वर्षे 68) रा कोंडके मळा बामनोली ,आनंद मल्लाप्पा वुभुते (वय वर्षे 65) रा एमआयडीसी कुपवाड व भारत बापू एमडी (वय वर्षे 49 ) मायाक्का नगर बामनोली हे याठिकाणी तीन पाणी जुगार खेळत असल्याने पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर जुगार प्रतिबंधक अधिनियम या  कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.     

         यामध्ये रोख रक्कम 1820 रु ,तीन दुचाकी वाहने व दोन मोबाईल असा एकूण दोन लाख 18 हजार 820 इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल गव्हाणे करत आहेत 

 


Post a comment

0 Comments