Good news विट्यात ऑक्सीजन बेड न मिळाल्यास, रुग्णाच्या घरी मशीन पोहचवून करणार ऑक्सीजनचा पुरवठा

: विटा बचाव कोरोना समितीची घोषणा 

सांगली ( राजेंद्र काळे)
        राज्यभरात ऑक्सीजन बेड न मिळाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे विटा बचाव कोरोना समितीने एक पाऊल पुढे टाकत ज्या रुग्णांना अक्सिजन बेड मिळणार नाहीत, त्यांना ऑक्सीजन मशीन घरापर्यंत पोहोचवून ऑक्सिजनची सोय करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समितीच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
          याबाबत अधिक माहिती अशी, ज्या रुग्णांना ऑक्सीजन बेड उपलब्ध होऊ शकत नाहीत, अशा रुग्णांच्या ऑक्सिजनची तात्पुरती व्यवस्था व्हावी यासाठी ऑक्सीजन कॉन्स्नट्रेटर मशीन लोकांच्या घरापर्यंत पुरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. होम कोरंटाईन असलेल्या रुग्णांची दररोज माहिती घेऊन लोकांचा जीव वाचवण्यासाठी बचाव समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. जेणे करून ५० होम कोरनटाईन लोकांच्या ऑक्सिजन बेड ची व्यवस्था होणार आहे, अशी माहिती विटा बचाव कोरोना समितीच्यावतीने दिली आहे.
        ऑक्सीजन बेडची संख्या वाढविण्याबाबत चाललेली उदगीर कारखान्या बरोबर चर्चा प्रत्यक्षात येत नाही असं लक्षात आल्यानंतर बचाव समितीने 3 सप्टेंबर रोजी माननीय प्रांतसो यांच्या समक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, विटा व तहसीलदार यांच्या समक्ष बैठक घेतली. त्यात सध्या इन्स्टिट्यूट कोरनटाईनसाठी असलेले आयटीआय
          शासकीय वस्तीगृहातील एका भागत 50 बेडचे ऑक्सिजनचे हॉस्पिटल चालू करण्यात यावे व त्याकरता स्टाफ आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावा व यात काही इतर डॉकटर देखिल मदत करतील, लागणाऱ्या ऑक्सिजनची संपूर्ण लाईन, बेड, दोन ड्युरा सिलेंडर हे समिती लोकवर्गणीतुन पुरवणार, व महसूल यांनी हे चालवण्याच्या पुढील सर्व खर्चाची व्यवस्था करावी, असा प्रस्ताव बचाव समिती मार्फत देण्यात आला होता. मा प्रांतसो यांनी हे मान्य करून पालकमंत्र्यांच्या आढावा बैठक मध्ये तसे जाहिर देखील केले होते.
          या गोष्टीवर बचाव समिती नियोजनात होती. त्या दरम्यान विटा नगरपालिकेने 50 बेडचे सर्व सोईनयुक्त हॉस्पिटल उभा करण्याचा निर्णय जाहीर केला. वास्तविक विटा नगरपालिका वेगळ्या ठिकाणी हे उभा करेल असे अपेक्षित होते. परंतु त्यांनी त्याच ठिकाणी जागा मिळवण्याची मागणी केल्यामुळे तिथे दोन वेगवेगळी रुग्णालय होणे हे तेथील उपलब्ध जागे अभावी हे शक्य नसल्यामुळे, व यामुळे प्रशासनावर व डॉक्टरांच्या वर विनाकारण ताण निर्माण होणार असल्यामुळे बचाव समितीने सदर जागेत पालिकेने त्यांची यंत्रणा वापरुन रुग्णालय उभा करावे अशी भूमिका आज बैठकीत घेऊन प्रशासनास तसे कळवले आहे.
          वास्तविक प्रशासन बेड वाढवण्याचा तातडीने निर्णय घेत नसल्यामुळेच समितीला तो निर्णय घ्यावा लागलेला होता. परंतु विटा पालिकेने हा निर्णय जाहीर केलेला असल्यामुळे, आम्ही त्यांचे स्वागत करत आहोत. समिती ही रुग्ण व प्रशासन व लोक यांच्यातील दुवा म्हणून काम करीत आहे. व पालिका प्रशासनाने पुढे येऊन अद्यावत स्टाफ सह पुढे येऊन हॉस्पिटल उभारल्यास लोकांना चांगली सेवा मिळू शकते. या भावनेतून बचाव समितीने पालिकेच्या या हॉस्पिटलच्या निर्णयास पाठिंबा दिलेला आहे. व समितीने इतर बाबतीत लोकांना मदत पोच करावी याबाबत निर्णय केला आहे.
         त्यानुसार  विटा  बचाव समितीच्या मार्फत प्राणवायू आपल्या दारी या नवीन संकल्पनेला सुरुवात करण्यात येणार आहे. यामाध्यमातून हाॅस्पीटल मध्ये ऑक्सीजन बेड न मिळालेल्या किंवा होम आयसोलेशन असताना ऑक्सीजनची गरज लागल्यास रुग्णाच्या घरापर्यंत पोहचून त्यांना ऑक्सीजन पुरवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती समितीच्यावतीने देण्यात आली आहे. दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा अशी विनंती समितीने केली आहे. यावेळी विटा बचाव कोरोना समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a comment

0 Comments