कडेगाव तालुक्यात बेकायदेशीरपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन

बैलगाडी चालक-मालक यांचेवर गुन्हा दाखल, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग

कडेगाव (सचिन मोहिते)
        करांडेवाडी ता.कडेगाव येथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून बैलगाडीच्या शर्यतीचे आयोजन करून बैलांना निर्दयतेने वागणूक दिल्याप्रकरणी पाचजणांसह अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         उमेश चंद्रकांत मुळीक रा. शाळगाव, ता. कडेगाव , दत्तात्रय दिनकर कारंडे वय ४८ चालक रा. रिसवड ता. कराड , संजय शंकर गायकवाड वय ४५ वर्ष चालक रा. गोवे, जिल्हा सातारा, कृष्णत विलास डांगे वय ३८ वर्षे रा. सैदापूर ता. कराड जिल्हा सातारा , अक्षय शिंदे रा. सैदापूर तालुका कराड जिल्हा सातारा तसेच इतर अनोळखी चालक-मालक यांचे वरती गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचेकडून टेम्पो एम .एच ११. टि . ५२०९, टेम्पो पिकअप एम .एच .४६ ए .आर ०४३४, टेम्पो पिकअप एम .एच ११टी ५५६३ ,टेम्पो पिकअप एम .एच. १० ए. क्यू .५५१३ इत्यादी वाहने मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
     याबाबत फिर्याद पो . हे .कॉ. विनायक जनार्दन कुंभार यांनी दिलेली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार महाडीक यांचेकडे दिला आहे.

Post a comment

0 Comments