खानापूर तालुक्यात आज १९ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह

विटा (प्रतिनिधी)
         खानापूर तालुक्यात आज १९ रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये विटा शहरातील ६, माहुली ५, पारे ५ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
         खानापूर तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे मात्र आज रविवार असल्याने चाचण्यांची संख्या कमी झाल्यामुळे दिवसभरात 19 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये विटा शहरातील ६, माहुली ५, पारे ५, चिखलहोळ २ आणि गार्डी येथील १ रुग्णांचा समावेश आहे. खानापूर तालुक्यात आजअखेर १३२१ रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यापैकी ५७९ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तर ७०१ रुग्णांवर सद्या उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत तालुक्यातील ४१ रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे यांनी दिली आहे.


Post a comment

0 Comments