चिरवळ ओढ्याला पूर, विटा- कराड वाहतूक ठप्प

विटा (राजेंद्र काळे )
         आज बुधवार ता. १६ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या धुवांधार पावसामुळे विटा शहरातील ओढा नाले ओसंडून वाहत असून चिरवळ ओढ्याला पूर आला.त्यामुळे विटा-कराड महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती.
        आज बुधवारी सायंकाळी विटा शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले होते. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात घुसण्याचे प्रकार देखील घडले. तर विटा- कराड रस्त्यावरील चिरवळ ओढ्याचे पात्र दुथडी भरून वाहू लागल्यामुळे कराड रस्त्यावरील चिरवळ येथे ओढ्याला पुर आल्यामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. या वर्षी दुसर्यांदा चिरवळ ओढ्याला पूर आला आहे. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
.....................................
चौकट
चिरवळ ओढापात्राचे रुंदीकरण करावे...
       नगरोत्थान योजनेतून केलेल्या सुशोभीकरणामुळे चिरवळ ओढ्याचे पात्र शंभर फुटांवरुन १७ फुटापर्यंत इतके कमी झाले आहे. चिरवळ ओढ्याच्या पूराची समस्या कायम स्वरुपी सोडविण्यासाठी या ओढ्याचे पूर्वी प्रमाणे रुंदीकरण करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहे.
अमर शितोळे, नगरसेवक विटा. 

Post a comment

0 Comments