आ. अनिलभाऊंनी ' कोरोनाला ' देखील पाणी पाजले


सांगली ( राजेंद्र काळे)

          टेंभू योजनेचे जनक, दुष्काळी भागातील पाणीदार आमदार अशी संपूर्ण  महाराष्ट्राला ओळख असलेल्या शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर यांनी अखेर कोरोना ला देखील पाणी पाजले आहे. शनिवार रात्री कोरोना वर यशस्वी मात करत त्यांचे विटा येथील निवासस्थानी आगमन झाले.
          खानापूर, आटपाडी, कडेगाव,  तासगाव या भागातील शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविण्याचे काम आमदार अनिलभाऊ बाबर यांनी  केले आहे. त्याचबरोबर  गेल्या ४०-५० वर्षाच्या संघर्षात त्यांनी अनेक विरोधकांना देखील पाणी पाजले आहे. परंतू गेल्या आठ दहा दिवसापूर्वी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. काही दिवस त्यांच्यावर होम आयसोलेशन मध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला होते. संघर्ष पाचवीला पुजलेला असल्याने अनिलभाऊ कोरोना वर देखील सहज मात करणार हा विश्वास कार्यकर्त्यांना होता. नुकतेच त्यांनी कोरोनावर मात केल्यामुळे मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे.
          खानापूर तालुक्यातील गार्डी या लहानशा गावाचे सरपंच ते खानापूर मतदारसंघाची चारवेळा आमदारकी असा प्रवास करताना आमदार अनिलभाऊ बाबर यांना मोठा संघर्ष करावा लागला. अनेक वेळा सत्ताकेंद्रापासून दूर राहून देखील त्यांनी संयमाने राजकारण करत विरोधकांना चारीमुंड्या चित करत पुन्हा विजयश्री खेचून आणली. सत्ता असो किंवा नसो टेंभू योजनेचा माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले आणि यशस्वी देखील झाले. म्हणूनच त्यांना पाणीदार आमदार म्हणून ओळखलं जातं.
        खानापूर मतदारसंघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर देखील लोकांच्या मदतीसाठी ते अहोरात्र प्रयत्नशील होते. त्यामुळेच आमदार अनिलभाऊ बाबर यांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सुरवातीला होम आयसोलेशनच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना पुणे येथील हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. नुकताच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याचे स्पष्ट झाले. अनेक संकटावर मात करणार्या या संघर्ष योद्धाने कोरोनाला देखील पाणी पाजल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्सह संचारला आहे.
...................................
चौकट
पुन्हा नव्या उमेदीने सज्ज...
         आमदार अनिलभाऊ यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार आगामी सात दिवस त्यांना कोरंटाईन व्हावे लागणार आहे. त्यानंतर भाऊ पुन्हा एकदा नव्या उमेदीने लोकांच्या सेवेसाठी चौवीस तास सज्ज राहणार आहेत.
         सुहास बाबर
        माजी उपाध्यक्ष (जि.प. सांगली)


 

Post a comment

0 Comments