विट्यात २ डॉक्टरांसह २९ कोरोना पाॅझीटीव्ह

विटा (प्रतिनिधी)
         विटा शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज मंगळवार ता. १५ रोजी एकाच दिवशी विटा शहरात दोन डॉक्टरांसह २९ रुग्णांचे कोरणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच तालुक्यात आज एकूण ४२ रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत.
         सांगली जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव जोरदारपणे सुरू आहे. विटा शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. आज विटा शहरातील दोन डॉक्टरसह २९ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तसेच ग्रामीण भागातील खानापूर-३ पारे -१, माहुली-१ , लेंगरे -१, भाळवणी-१, कार्वे-३, गार्डी -३ असे तालुक्यातील एकूण ४२ रुग्ण आज कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत.
          खानापूर तालुक्यात आतापर्यंत ११४३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी ४३२ रुग्णानी कोरोना वर मात केली आहे. तर ६७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे यांनी दिली आहे. 

Post a comment

0 Comments