कोरोनाचे संकट घरात, पण सुहासभैय्या लढण्यासाठी मैदानात....

: सुहासभैय्या लोकांना आधार देण्यासाठी सज्ज
: मोबाईल वरुन प्रशासन आणि नागरिकांच्या संपर्कात

सांगली ( राजेंद्र काळे)
         आमदार अनिलभाऊ बाबर यांचा कोरोना चाचणी अहवाल दोन दिवसापूर्वी पॉझिटीव्ह आला.  त्यानंतर आमदार बाबर यांना होम आयसोलेशन करून उपचार देण्यात येत आहेत. कुटुंब कोरोनाच्या संकटात असताना युवा नेते सुहास भैया बाबर यांनी मात्र कुटुंबासह संपूर्ण मतदार संघाची कमान मोठ्या धीराने संभाळत पहिल्या दिवसापासूनच कामाला नियोजनबद्धरीत्या सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
            कोरोनाचे संकट जवळ आल्यानंतर अनेक राजकीय नेते मंडळीनी स्वतःहून समाजापासून संपर्क तोडला. मात्र खानापूर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अनिल भाऊ बाबर यांनी गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाच्या भीषण वणव्यात स्वतःला झोकून देत अथकपणे लोकांना वैद्यकीय सेवा तसेच त्यांच्या अन्य समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. दुर्देवाने दोन दिवसापूर्वी आमदार बाबर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पण या संकटाला देखील आमदार अनिलभाऊ बाबर आणि कुटुंबिय मोठ्या धैर्याने सामोरे गेल्याचे पाहयला मिळत आहे.
            आमदार अनिलभाऊ यांना होम आयसोलेशन करुन उपचार  सुरू असताना, युवा नेते सुहास बाबर यांनी मात्र विटा शहरासह संपूर्ण मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी 24 तास धडपड सुरू केली आहे. कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबातील लोकांना आधार देणे, रुग्णांना आवश्यकतेनुसार बेड उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे, रुग्णाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत सल्ला मसलत करणे. कोरोनाच्या संकटात सर्वांना धीर देणे अशी कामे अहोरात्र सुरू आहेत. तसेच कालरात्री झालेल्या मुसळधार पावसाने सांगोला, वाळूज, वेजेगाव परिसरातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील  तातडीने करण्याच्या सुचना सुहास बाबर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
        एकंदरीतच कोरोना चे संकट घरात येऊन धडकले असले तरी सुहास बाबर यांनी मोठ्या धैर्याने या संकटाला सामोरे जात मतदारसंघातील लोकांची अथकपणे सेवा सुरू ठेवली आहे. त्यांच्या या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.......................................
  चौकट
संयम बाळगा, सर्वकाही ठिक होईल...
        : आमदार अनिलभाऊ यांचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. कोरोनाच्या या संकटात लोकांना अनेक अडचणी येत आहेत. अनिलभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली बाबर कुटुंबिय आणि कार्यकर्ते अहोरात्रपणे लोकांच्या या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. संकट मोठे आहे, पण सर्वांनी संयम बाळगा, सर्वकाही ठिक होईल. लवकरच आपण या सर्व संकटावर मात करु, असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी व्यक्त केला आहे.

 

Post a comment

1 Comments