सागरेश्वर अभयारण्य खुले करण्यासाठी आरपीआय आक्रमक

: निदर्शने करून वनक्षेत्रपाल यांना दिले निवेदन

कडेगाव ( सचिन मोहिते)
           रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस - कडेगाव विधानसभा क्षेत्र यांच्यावतीने सागरेश्वर अभयारण्य गेट समोर आभायरण्य खुले करण्यासाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाम. रामदासजी आठवले साहेब, आरपीआय राज्य सचिव विवेकरावजी कांबळे , पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जगन्नाथ दादा ठोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय चे माजी जिल्हाध्यक्ष महादेवराव होवाळ व आरपीआय पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
         यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की सहा सात महिने कोरोना च्या काळात सर्वसामान्य जनता लॉकडाऊन मुळे त्रस्त आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी लोकभावना ओळखून लॉकडाऊनमधील बऱ्याच गोष्टी शिथिल केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून लोकांना विरंगुळा मिळण्यासाठी शासनाने पर्यटन स्थळे खुली करण्याची गरज आहे. सागरेश्वर आभायरण्य खुले केल्यास भागातील जनतेला त्याचा फायदा होईल. जनतेच्या मनातील कोरोनाची भीती कमी होईल.कोरोना सोबत जगण्यासाठी हळूहळू शासनाने जनतेला प्रत्येक गोष्टीची नियमावली तयार करून खुली करण्याची आक्रमक मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शासनास करण्यात आली आहे. यावेळी चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. संतोष गोसावी यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.
           यावेळी आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष महादेवराव होवाळ, पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे, जिल्हा उपाध्यक्ष संजय मस्के, वंचित युवक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे, खानापूर तालुका अध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे, युवक कडेगाव तालुका अध्यक्ष विजय गवाळे, युवक खानापूर तालुका अध्यक्ष स्नेहलकुमार कांबळे, पलूस तालुका उपाध्यक्ष शितल मोरे, आरपीआय विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष प्रसाद शिखरे, खानापूर तालुका उपाध्यक्ष हणमंत खिलारे, इस्लामपूर शहर अध्यक्ष अमरभाऊ बनसोडे, मुस्लिम आघाडी कडेगाव तालुका अध्यक्ष दस्तगिर फकीर, बसपा जिल्हा महासचिव शिवलिंग सोनवणे, युवक जिल्हा उपाध्यक्ष निलेश गवाळे, युवक पलूस तालुका उपाध्यक्ष किशोर मोहिते, सागर महापुरे, वैभव तिरमारे, जितेंद्र सोरटे, अक्षय तिरमारे, दिनेश होवाळ, सूर्यकांत सरतापे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a comment

0 Comments