विट्याचे माजी नगरसेवक आनंदराव पाटील यांचे निधन

विटा प्रतिनिधी

       विटा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आनंदराव भैरु पाटील (वय- ८५ ) यांचे अल्पशा आजाराने आज सोमवार ता. १४ रोजी निधन झाले. राजकीय क्षेत्रासह, सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रभागी राहत.
       माजी नगरसेवक आनंदराव पाटील हे आबा या नावाने सर्वपरिचित होते. सन १९९० च्या दशकात   शहरातील घोगाव पाणी योजना पूर्णत्वास येण्यापूर्वी आपल्या शेतातील बोअरचे पाणी त्यांनी शहरातील  नागरिकांना तसेच किरकोळ व्यवसायिंकाना खुले केले होते. ऐन दुष्काळी परिस्थितीत आपल्या बोअरचे पाणी शेतीसाठी न वापरता लोकांना स्वखर्चाने पाणी वाटप करणारे ते खरेखुरे जलदूत होते.
        गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.  आज सोमवार ता. १४ रोजी सकाळी त्यांचा देहांत झाला. सामाजिक कार्यकर्त्या सविता जाधव आणि हणमंत पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 

Post a comment

0 Comments