कुपवाड येथे धारदार शस्त्र बाळगणाऱ्याला अटक

: चार धारदार शस्त्र जप्त

कुपवाड ( प्रमोद अथणीकर )
        येथील कुपवाड परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील मेनन पिस्टन चौकात एक संशयित हत्यार बाळगून गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने वावरताना पोलिसांनी त्यास पकडून गुन्हा नोंद केला आहे.
          मिळालेल्या माहिती नुसार कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये बुधवारी सायंकाळी ७.३० च्या दरम्यांन मेनन पिस्टन चौकांमध्ये संशयित आरोपी सिद्धनाथ मधुकर चौगुले रा. दुर्गा नगर मिरज हा इसम वावरताना दिसून आला. यावेळी पोलिसांना त्याच्या बद्दल संशय येताच विचारणा केली असता त्याच्याजवळ चार धारदार शस्त्रे आढळून आली. त्यामध्ये एक कोयता, सत्तुर, दोन लोखंडी सूऱ्या असा एकूण 650 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्या जवळ आढळून आला. तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशून फिरत असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला असून त्यास पोलिसांनी पकडून त्याच्या वर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस काॅन्सटेबल पाटील करीत आहे.

Post a comment

0 Comments