चाकूने गळा कापून कोरोंनाबाधित रुग्णाची हॉस्पिटल मध्येच आत्महत्या

सांगली (प्रतिनिधी)

   मिरज कोविड रुग्णालयात रविवारी मध्यरात्री एका कोरोना बाधिताने चाकूने गळा कापून घेवून आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळताच सांगली जिल्हयात मोठी  खळबळ उडाली आहे.

        मिरज येथील हुसेन बाबुमिया मोमीन (वय ५५ रा.मिरज-मालगाव रोड, अमननगर) यांना कोरोना झाल्यामुळे उपचारासाठी दहा दिवसांपूर्वी मिरज कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर उपचार व्यवस्थित न करण्यात आल्यामुळे त्यांनी चाकूने गळा कापून आत्महत्या केली आहे. अशी मोमीन यांच्या नातेवाईकांनी तक्रार आहे.

   याबाबत मिरज कोविड रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे मोमीन यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे समजू शकले नाही.

 

 

 

Post a comment

0 Comments