सांगली जिल्ह्याला दिलासा, सलग चार दिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जादा

सांगली (राजेंद्र काळे )
            सांगली जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून दररोजच्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणार्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याचे समाधानकारक चित्र पहायला मिळत आहे. आज गुरुवार ता. २४ रोजी ६८५ रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर यापेक्षा जादा म्हणजेच ८६५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ सुरू होती. मात्र गेल्या चार दिवसात ही वाढ आटोक्यात राहिली आहे तर कोरोनामुक्त होणार्या रुग्णाच्या संख्येत दिलासादायक वाढ होत आहे.
           आज गुरुवार ता.२४ रोजी ६८५ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. तर दिवसभरात ८६५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज ता. २४ रोजी सांगली महापालिका क्षेत्रात १५६ रुग्णांचे कोरोनाचं अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांगली शहर ९३ तर मिरज शहरातील ६३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी- २५, जत -१८, कडेगाव - ३४ कवठेमंकाळ -७७, खानापूर - ३९, मिरज- ८० पलूस- ४८, शिराळा- ४७, तासगाव- ४९, आणि वाळवा -११२ इतक्या रुग्णांचा समावेश आहे.
तर सांगली जिल्ह्यात आज २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments