कोरोनाच्या महामारीत लघुउद्योग संकटात

शिराळा (अरुण पाटील)
         गेली सहा सात महिने झाले कोरोनाने पुरता धुडगूस घातला आहे. संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले आहे . यात भरडला गेला तो सर्वसामान्य माणूस! ज्याचे हातावर पोट आहे तो माणूस' या महामारित पुरता बेजार झाला. रोज कमविणे आणि त्याच कमविलेल्या पैशात दोन वेळची भूक भागविणे. यासाठी लघु उद्योग व्यवसाय करनाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे.
          प्लास्टिकच्या अति वापराने आज बुरुड लोकांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. सुरवातीला महिनाभर दुकानदाराने उदार दिले पण आदिचीच उधारी बाकी असल्याने परत परत उधार देणे बंद केले. लघुउद्योग करणारे असे छोटे-छोटे उद्योग ज्या उद्योगावर आपले पोट भरणारे अनेक लोक आज यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या बांबुपासून वस्तु बणविणाऱ्यांचे तर अतोनात हाल आहे. बांबु पासून टोपल्या, खुराडी, अशा वस्तु बणवून त्या गावोगावी जाऊन विकायच्या आणि त्या पैशावर आपला प्रपंच चालवायचा असा यांचा दिनक्रम. परंतु या कोरोनाच्या महामारित त्यांचे कंबरडेच मोडले आहे. आधीच प्लास्टिकने हा धंदा पूर्ण हद्दपार केला आहे. त्यात कुठतरी खुराडी, भाकरिची बुटी, शेणाची पाटी यावरच या बुरूड समाजाचा गुजारा असतो. आज सहामहिने झाले कोरोनामुळे कोणी गावात फिरू देत नाही त्यामुळे बनविलेला माल जाग्यावरच आहे. त्यात बांबुचे पैसे अंगावरच अशा परिस्थीतीत बुरूड व्यावसाय अडकला आहे.
            खरं पाहता गेली सहा महिने झाले आम्ही एकचवेळ जेऊन दिवस ढकलत आहे. आमची सरकारकडे एकच मागणी आहे. आम्हाला दोन वेळचे जेवता येईल किमान एवढी पेन्शन चालु करावी, किंवा जे आम्ही वस्तु बनवत आहे त्या आम्हीच बणवून विकाव्या, प्लास्टिकच्या वस्तु बंद कराव्या किमान आम्ही आमच्या वस्तु बणवून विकू अणि त्यावरच गुजरण करू एवढीच मागणी असल्याचे येथील बुरूड समाजातील कुटूंबियांनी 'महासत्ता'शी बोलताना सांगीतले.

Post a comment

0 Comments