रिपाईंचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांचे निधन


विटा (प्रतिनिधी)
        रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे (वय -53 रा. विटा) यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने विटा येथे निधन झाले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे खास सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.
        सांगली जिल्ह्यातील चळवळीतील क्रियाशील नेतृत्व म्हणून बाबासाहेब कांबळे यांची ओळख होती. त्यांनी अनेक वर्षे खानापूर तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. सहा महिन्यापूर्वी त्यांची रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असे.                 काल बुधवारी त्यांनी कडेगाव बलात्कार प्रकरणातील निलंबित पोलीस निरीक्षकावर कारवाई करावी यासाठी आंदोलन केले होते.
आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास बाबासाहेब कांबळे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना विटा येथील यशश्री या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्यावर आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे.

Post a comment

0 Comments