भेसळयुक्त खत विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करा

: सामाजिक कार्यकर्ते गोरख औंधे यांची मागणी

नेर्ली/कडेगाव (संदीप कुलकर्णी)
         भेसळयुक्त खत विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कडेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री गोरख औंधे यांनी कडेगाव तालुका कृषी अधिकारी बाळकृष्ण कदम यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
           श्री औंधे म्हणाले, शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो. शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करत असतो. यासाठी त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. दर्जेदार पीक मिळावे या उद्देशाने शेतकरी नामांकित कंपन्यांच्या खतांची खरेदी करतो. परंतु अलीकडे नामांकित कंपन्यांच्या नावाखाली या खतांमध्ये वाळूमिश्रित खत देऊन शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न काही कंपन्या करीत आहेत.
          यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन भेसळ करून लुटणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी श्री गोरख औंधे यांनी निवेदनाद्वारे कडेगाव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावर कडेगाव तालुका कृषी अधिकारी बाळकृष्ण कदम म्हणाले की याआधीही काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत. संशय असलेल्या कंपन्यां च्या खतांचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांचे नुकसान जर कोणती कंपनी करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कडेगाव तालुका कृषी अधिकारी बाळकृष्ण कदम यांनी स्पष्ट केले.

Post a comment

0 Comments