सागरेश्वर अभयारण्य भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईसाठी आमरण उपोषण


: वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे

चिंचणी/कडेगाव ( कुलदीप औताडे )
        यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य देवराष्ट्रे येथील विविध विकास कामांतील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर त्वरित फौजदारी स्वरूपाची कारवाई करणेच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभयारण्य गेटसमोर बुधवार पासून आमरण उपोषण करणार आहे, असे निवेदन वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
          निवेदनात म्हटले आहे कि सागरेश्वर अभयारण्यात समितीच्या माध्यमातून साहित्य खरेदीमध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे. बाजारभावापेक्षा दुप्पट ते चौपाट किंमतीत वस्तू खरेदी केली आहे. बोगस मजुरांची नावे नोंदवत आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे तसेच 3 वर्षांतील नमुना 32 रजिस्टर व धनादेश पुस्तकेच गायब केलेली आहेत. अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहेत, निकृष्ट कंपाउंडमुळे मोकाट कुत्र्यांचे हल्ले होऊन वारंवार हरिणांचे मृत्यू होत आहेत. त्याचप्रमाणे कॅशबुकमध्ये न केली नसलेली कामे दाखवत शासकीय निधीची लूटच केलेली आहे.
याबाबत गेले वर्षभर माहिती अधिकार, निवेदन, आंदोलन याद्वारे कारवाई साठी मागणी करत असताना अद्याप कारवाई झालेली नाही, आंदोलनादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देऊन देखील कारवाई होत नसलेने आम्ही उपोषण करत आहोत.

Post a comment

0 Comments