कडेगावात आठ दिवस जनता कर्फ्यू, नागरिकांचा प्रतिसाद

नेर्ली/कडेगाव (संदीप कुलकर्णी)
         कडेगाव शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता कडेगाव शहरातील व्यवहार ७ सप्टेंबर पासून आठ दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत पदाधिकारी, नागरिक व व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बंदला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा नीता संदीप देसाई यांनी दिली आहे.
         नगराध्यक्षा नीता देसाई म्हणाल्या, सोमवार ता. ७ सप्टेंबर पासून आठ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता कडेगाव शहरात पूर्णपणे बंद पाळण्यात येणार आहे. या बंदला सोमवारी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना पासून बचाव व्हावा म्हणून नगरपंचायत प्रशासन तसेच पोलीस प्रशासन लोकांना घराबाहेर पडू नये या साठी वारंवार आव्हान करीत आहेत. नागरिकांनी आठ दिवस जनता कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन करुन कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मदत करावे असे आवाहन नगराध्यक्षा नीता देसाई यांनी केले आहे.
         यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत जाधव, नगरसेवक नितिन शिंदे, सुनिल पवार, उदय देशमुख, व्यापारी - विवेक भोसले, सुनिल गडळे, युवराज मोरे, विजय गायकवाड व जगताप साहेब मुख्य अधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments