विराज केन्स पूर्ण क्षमतेने गाळपासाठी सज्ज : अॅड. सदाशिवराव पाटील

आळसंद: विराज केन्स शुगर हाऊस मध्ये जागरी पावडर पोत्यांचे पूजन करताना माजी आ. अॅड सदाशिवराव पाटील, अॅड. वैभव पाटील, उत्तम पाटणकर, गोविंदराव भोसले आदी.

विटा ( राजेंद्र काळे)
      विराज केन्स शुगर कारखाना पूर्ण क्षमतेने गाळपासाठी सज्ज झाला असून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदारअॅड सदाशिव पाटील यांनी केले.
         विराज केन्स शुगर हाऊस मध्ये आज जागरी पावडर पोत्यांचे पूजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड  सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले विराज कारखाना हा पूर्णक्षमतेने चालवण्यास सज्ज  झाला आहे.  तरी परिसरातील शेतकरी व सभासदांनी आपला उत्पादित ऊस हा कारखान्याला पाठवून लाभ घ्यावा. योग्य दर, योग्य वजन आणि वेळेत ऊसतोड यानुसार नियोजन करत कारखाना शेतकर्यांच्या विश्वासाला पात्र ठरेल असा विश्वास माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केला.
         यावेळी कार्यकारी संचालक अॅड वैभव पाटील, संचालक उत्तम पाटणकर, गोविंदराव भोसले, राजेंद्र माने, अशोक मोरे, विशाल पाटील , श्रीकांत पाटणकर, संग्राम  देशमुख,  जनरल मॅनेजर विजय कुलकर्णी, चिफ केमिस्ट दिपक पाटील, दिपक जांभळे, शेती अधिकारी रमेश शिंदे, चीप अकाउंटंट हैदर शिकलगार  व कर्मचारी वृंद, सभासद शेतकरी, वाहतूक तोडणीदार, सर्व हमाली कंत्राटदार उपस्थित होते
 

Post a comment

0 Comments