कडेगाव तालुक्यात आज 59 रुग्ण पाॅझीटीव्ह

नेर्ली/कडेगाव ( संदीप कुलकर्णी)
        कडेगांव - लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशीही कडेगाव तालुक्यात कोरोनाचा आलेख चढताच दिसून येत आहे. आज दिवसभरात कडेगाव तालुक्यातील 59 रूग्णांचे अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत.
         कडेगाव ही आजुबाजूच्या खेडेगावांसाठी मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. ही बाजारपेठ गेले चार दिवस पुर्ण पणे बंद आहे.मात्र कोरोनाचा आलेख सद्या दररोज वाढत आहे. आज दिवसभरात कडेगाव तालुक्यातील 59 रूग्णांचे अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत. या मध्ये कडेगाव - 8 चिंचणी-5 खंबाळे -5 वडीयेरायबाग- 22 मोहिते वडगाव -1 रामापूर-2 शाळगाव -1 शिवणी -1 सोनकिरे - 1 सोनसळ -1 तडसर - 1 तोंडोली - 1 उपाळे मायणी - 2 उपाळे वांगी - 4 वांगी - 1 सातारा -3 असे 59 रुग्णाचे अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत. तालुक्यातील आजपर्यंत
एकूण 957 रुग्ण आढळून आले असून बरे झालेले 405 रुग्ण आहेत तर उपचारा खाली 532 रुग्ण आहेत.

Post a comment

0 Comments