कुपवाड येथील 14 वर्षाच्या मुलाच्या अपहरणाने खळबळ


कुपवाड (प्रमोद अथणीकर)
         कुपवाड येथील कापसे प्लॉट परिसरातील 14 वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
     पोलिसाकडून मिळालेल्या माहिती अशी, कुपवाड परिसरातील अमित कुमार श्रीराम गुप्ता ( वय वर्षे 14 रा. लाडले मशाल कॉलनी, कापसे प्लॉट कुपवाड) या मुलाचे 9 सप्टेंबर  रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास अज्ञातांनी अपहरण केल्याची तक्रार  त्याचे वडील श्रीरामनाथ गुप्ता यांनी दिली आहे अमित हा त्याचा मामा ज्या ठिकाणी काम करत आहे तेथे जाऊन त्यास भेटून येतो असे सांगून गेला असता अद्याप तो घरी परत आला नाही . यानंतर  त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली आहे.   
   गेल्या महिन्याभरात अपहरणाचा हा दुसरा प्रकार घडल्याने कुपवाड परिसरातील नागरिकांच्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल गडदे करत आहेत.

Post a comment

0 Comments