बळवंत महाविद्यालयात मुलांच्या सुसज्ज वसतिगृहाचे भूमिपूजन


विटा : बळवंत महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन करताना रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. व्ही. एस. शिवणकर, यावेळी मा. आबासाहेब देशमुख, माधवराव मोहिते उपस्थित होते. ( छाया- रवींद्र काळे)

विटा, प्रतिनिधी
          येथील रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुसज्ज वसतिगृहाचे भूमिपूजन संस्थेचे सचिव प्राचार्य व्ही.एस. शिवणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आबासाहेब (काका) देशमुख हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माधवराव (दादा) मोहिते हे उपस्थित होते.
सुरुवातीला पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि बळवंतरावजी चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सचिव शिवणकर यांच्या हस्ते मुलांच्या वस्तीगृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा परिचय व मान्यवरांचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सी.जे. खिलारे यांनी मानले. हे वसतिगृह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून विटा परिसरातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध भागातून येणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा शैक्षणिक विकासासाठी नेहमीच फायदा होईल, असे मत संस्थेचे सचिव प्राचार्य व्ही.एस. शिवणकर यांनी व्यक्त केले.
       या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.Post a comment

0 Comments