आमदार मोहनराव कदम कोरोना पाॅझीटीव्ह


: राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ

कडेगाव (सचिन मोहिते)
          राज्यातील मोठमोठ्या राजकीय नेत्यांना कोरोना  झाल्यानंतर आता सांगली जिल्ह्यात देखील राजकीय नेते मंडळींना कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. नुकतेच माजी मंत्री सुरेश खाडे, युवा नेते जितेश कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांना यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.
          कोरोनाने राज्यासह देशभरात धुमाकूळ घातला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, गृहमंत्री अमित शहा यांच्या पासून ते राज्यातील विविध मंत्री, आमदार, खासदार, महापौर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता सांगलीत देखील कोरोनाचा विळखा आणखीन घट होताना दिसत आहे. नुकतेच माजी मंत्री आणि मिरज मतदार संघाचे आमदार सुरेश खाडे तसेच युवा नेते जितेश कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव आमदार मोहनराव कदम यांना कोरोना  झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.


 

Post a comment

0 Comments