शिक्षण ऑनलाईन, पण मोबाईल अभावी विद्यार्थी ऑफलाईन


: मोबाईल नसल्याने ' ऑनलाईन ' शिक्षणाची तार जुळेना

पेठ ( रियाज मुल्ला )
         कोरोनाच्या काळात शाळा सुरु होण्याची चिन्हे दिसेनात म्हणून मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाद्वारे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची धडपड ,तर वेळेअभावी पालक वर्गाची होणारी तारेवरची कसरत पाहता शिक्षक झाले ऑनलाईन अन विद्यार्थी मोबाइल अभावी झाले ऑफलाईन असाच काहीसा प्रकार घराघरातून दिसून येत आहे.
       ऑनलाइन शिक्षणामुळे अँड्रॉईड मोबाइल चे महत्व अचानक वाढले,परिणामी जुन्या मोबाईलना सोन्याचे दिवस आले.रोजनदारीवर काम करणारे , मजूर , गोरगरीब पालक वर्गाने मुलांच्या शिक्षणाला महत्व देत अँड्रॉइड मोबाईल घेण्याकडे कल वाढला. नवीन अँड्रॉईड मोबाईलच्या किमती अव्वाच्या सव्वा असल्या कारणाने मुलाच्या शिक्षणासाठी जुन्या  मोबाईल घेण्याकडे कल वाढला, शिक्षण तर ऑन झाले मात्र मोबाईल अन त्याला मारावा लागणारा  नेट पॅक मूळे खिसा ऑफ होऊ लागला.
    काही पालकांच्या कडे एकच मोबाईल आहे त्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. दिवसभर काम करून दमून भागून घरी यायचे, सकाळी आलेला अभ्यास रात्री मुलांकडून करून घ्यायचा अन ज्या वर्गात शिकतोय त्या वर्गाच्या व्हाटसअप ग्रुप वर ते फोटो नित्यनियमाने टाकायचे. रोजच्या रोज शाळेची हजेरी अन शाळेचा अभ्यासक्रम येणाऱ्या लिंक वर भरायचा. शिक्षक लोकांची धडपड अन पालक वर्गाची कसरत बघता मास्तर झाले ऑनलाइन तर पालक झालेत शिक्षक असाच काहीसा प्रकार दिसून येत आहे.

 

Post a comment

0 Comments