पलूस-कडेगाव मतदारसंघात भाजपाला खिंडार


वांगी : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वांगी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी क्रांती उद्योग समुहाचे प्रमुख अरूण आण्णा लाड, जि. प . गटनेते शरद भाऊ लाड उपस्थित होते .

कडेगाव, ( सचिन मोहिते)
          वांगी तालुका कडेगाव येथील भाजपच्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी क्रांती उद्योग समुहाचे प्रमुख अरूण आण्णा लाड, जि. प . गटनेते शरद भाऊ लाड प्रमुख उपस्थित होते .
           वांगी येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेल्या दोन वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या कामकाजावर नाराज होते. तसेच स्थानिक काही कार्यकर्त्यांनी नेत्याजवळ केलेल्या बिनबुडाच्या चाड्या व कोंडाळ्यामुळे नाराज झालेल्या भाजपाच्या ३० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख आणि माजी जि.प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.
            यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भुमिका आम्ही निश्चित घेवु तसेच कडेगाव तालुक्यातील विकास कामांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगीतले
          यावेळी बोलताना रमेश एडके म्हणाले की बहुजन कष्टकरी समाजाला अरुण आण्णा लाड व शरद भाऊ लाड हे न्याय देऊ शकतात, ही आम्हा सर्वांना खात्री आहे व बहुजन समाज व वांगी गावचा सर्वांगिण विकास क्रांति उद्योग समुह निश्चित पणाने करेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली .
यावेळी रमेश एडके ,बाळासाहेब वत्रे, सतीश तुपे, शामराव हुबाले ,जगन्नाथ चव्हाण, अशोक देशमुख, धोंडीराम कोळी ,संंजय कुंभार, संजय एडके, संजय कांबळे ,आबासो शिंदे, संतोष दाईंगडे, बुवाजी देशमुख, श्रीहरी सुर्यवंशी, इंद्रजीत मोहीते, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments