खानापूर तालुक्यात आणखी एक पॉझिटिव्ह


विटा, प्रतिनिधी
        खानापूर तालुक्यातील धोंडगेवाडी येथील एका 55 वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्ण तीन दिवसापूर्वी सांगली येथे उपचारासाठी गेला होता. त्याला कोरना ची लक्षणे दिसत असल्यामुळे त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. आज त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर मिरजेतील सेवासदन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 97 वर पोहोचला असून सद्या 57 रुग्णांवर उपचार सुरू असून 38 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 2 रुग्णांचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य डाॅ अनिल लोखंडे यांनी दिली आहे. 

Post a comment

0 Comments