इस्लामपूर पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव

इस्लामपूर (हैबत पाटील ) : येथील वाळवा पंचायत समिती मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंताला कोरोना तपासणी अहवाल रात्री पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पंचायत समिती इस्लामपूर वाळवा येथे खळबळ उडाली आहे 
        हा अहवाल येताच प्रशासनाने तत्काळ उपाययोजना हाती घेतल्या असून सोमवारी कुणीही पंचायत समितीच्या कोणत्याही विभागाशी संपर्क टाळावा असे आवाहन गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
हे उपअभियंता सांगली येथे वास्तव्यास होते. इस्लामपूर कार्यालयात ये जा करत होते. त्यामुळे धोका वाढला असून आता खबरदारी घेतली जाणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. दरम्यान वाळवा तालुक्यात काल आणखी चार जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यामध्ये इस्लामपूर, ताकारी व मसुचिवाडी येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत.

Post a comment

0 Comments