कुंडल कारखान्याकडून मिरज रुग्णालयास ऑक्सिजन थेरपीसाठी मोठी मदत


मिरज : क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड कारखान्याच्यावतीने उच्च प्रवाह अनुनासिक कॅनूला हे उपकरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मिरज रुग्णालयास सोपविण्यात आले.

चिंचणी, (कुलदीप औताडे)
         सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजन थेरपीसाठी मिरज जिल्हा रुग्णालयाला क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल यांच्या मार्फत उच्च प्रवाह अनुनासिक कॅनूला (एच. एफ. एन. वो.) उपकरणाची मदत देण्यात आली.
         जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजन थेरपीसाठी क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल यांच्यावतीने देण्यात आलेल्या या उपकरणाचा रुग्णांना मोठा उपयोग होणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते मिरज कोव्हीड रुग्णालयाला नुकतेच हे उच्च प्रवाह अनुनासिक कॅनूला (एच. एफ. एन. वो.) उपकरण मदत म्हणून देण्यात आले.
          यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन अरुण अण्णा लाड, व्हा. चेअरमन अनंत जोशी, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, डॉ.सुधीर नानंदकर, डॉ.संजय सांळूखे, संजय बजाज, राहुल पवार, मैनुद्दीन बागवान आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments