ब्रम्हणाळच्या माया शिवाजी गडदे यांना जिल्हा युवा पुरस्कार


: स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.

पलूस (प्रतिनिधी)
          दरवर्षी सांगली जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा युवा पुरस्कार दिला जातो. २०१७-१८चा युवा पुरस्काराने पलूस तालुक्यातील ब्रम्हणाळ येथील महिला चळवळीतील धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या कु. माया शिवाजी गडदे यांना सन्मानित करण्यात आले.
          आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयतंराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.गोरगरीब  विधवा, परितक्ता महिलांमध्ये त्यांच्या हक्काची जाणीव जागृती करून त्यांना समाजाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभा करून त्यांच्या सन्मानासाठी झटणारी शाहू ,फुले, आंबेडकर यांच्या विचारांची कृतीशील कार्यकर्ता अशी कु.माया गडदे यांची ओळख आहे. या पुरस्काराने त्यांच्या प्रमाणेच चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे.

Post a comment

0 Comments