विटा : पालिका कर्मचाऱ्याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन


: सांगली जिल्ह्यात आज एकूण १४ जणांचा मृत्यू
: जिल्ह्यात दिवसभरात ११२ रुग्णाची वाढ


सांगली, प्रतिनिधी
         सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात ११२ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात एकूण १४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये विटा पालिकेतील एका कर्मचाऱ्याच्या वडिलांचा देखील समावेश आहे.
          सांगली जिल्ह्यात आज नवीन ११२ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सर्वाधिक महापालिका क्षेत्रातील ८६ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये सांगली शहरातील ६२ तर मिरज शहरातील २४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी-२ जत-२, कवठेमंकाळ-५ खानापूर-२, मिरज-९ पलूस-२, तासगाव-३ वाळवा-१ असे एकूण ११२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे अन्य जिल्ह्यातील १५ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
       उपचारादरम्यान खानापूर तालुक्यातील मयत झालेली ९० वर्षाची व्यक्ती विटा पालिकेच्या कर्मचार्यांचे वडील असून ते मुळचे नागेवाडी येथील रहिवासी आहेत.

Post a comment

0 Comments