भरपावसात तानाजी पाटील कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावले

 

आटपाडी : कोरोनाग्रस्त रुग्णांना सांगली येथील आयसीयु मधील बेड मिळवून देण्यासाठी तानाजी पाटील यांनी आटपाडी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात सुमारे साडेतीन तास ठिय्या मारला होता.

सांगली ( राजेंद्र काळे)
          कोरोनाच्या संकटकाळात एकाबाजूला रक्ताची नाती दुरावल्याचे दुर्दैवी चित्र सर्वत्र पहायला मिळत असताना आटपाडीचे युवानेते तानाजी पाटील मात्र भर पावसात कोरोनाग्रस्त दाम्पत्याच्या मदतीला धावून गेल्याची घटना समोर आली आहे. रुग्णांच्या  उपचारासाठी  पावसाची पर्वा न करता तब्बल साडेतीन तास रुग्णालयाच्या आवारात थांबलेल्या तानाजी पाटील यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आणि या युवानेत्यावर  कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.
           आटपाडी तालुक्याचे तानाजी पाटील हे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जातात. अनिलभाऊंचा कार्यकर्ता हेच आपल्यासाठी जिवनातील सर्वांत मोठे पद असे मानणारा हा निष्ठावंत आणि जिगरबाज कार्यकर्ता. राजकीय आखाड्यात या कार्यकर्त्यांची जिगर आजपर्यंत लोकांनी अनेक वेळा अनुभवली आहे. आता मात्र कोरोनाच्या आखाड्यात देखील हा कोव्हीड योद्धा शड्डू ठोकून उभा असल्याचे दिसून येत आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप किंवा सॅनिटायझर वाटप पुरते मर्यादित न राहता हा योद्धा  कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी थेट  धावून जात आहेत.
             आज १५ ऑगस्ट रोजी दुपारी त्यांना आटपाडी येथील  हाॅस्पीटल मधून फोन आला आणि यपावाडीतील एक जेष्ठ नागरिक आणि त्यांच्या पत्नीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे सांगण्यात आले. तानाजी पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालय गाठले आणि या दाम्पत्याला आधार दिला. वैद्यकीय तपासणीनंतर या दाम्पत्याला आयसीयुची सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे डाॅकटरांनी सांगितले. तानाजी पाटील यांनी खटाटोप करत सांगली येथील  हाॅस्पीटल मध्ये एक आणि सांगोला येथील हाॅस्पीटल मध्ये  एका बेडची व्यवस्था केली आणि दोन्ही रुग्णांना उपचारासाठी रवाना केले.
        पाटील यांनी या कोरोनाबाधित रुग्णांच्या पुढील उपचाराचे नियोजन करण्यासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात भरपावसात सुमारे साडेतीन तास ठिय्या मारला होता. अर्थात कोरोनाची धास्ती घेतल्यामुळे नातेसंबंधातील लोक दवाखान्यात नव्हे सुखदुःखाच्या कार्यक्रमात जात नाहीत. अशावेळी आटपाडीचा तानाजी पाटील हा जिगरबाज कोव्हीड योद्धा थेट रुग्णापर्यत पोहचून त्यांना पुढील उपचारासाठी मदत करत आहे. निश्चिंतपणे तानाजी पाटील यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे.
..................................................
चौकट :
         लोक संकटात आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. इथे कुठला राजकीय पक्ष म्हणून नव्हे तर माणुसकीच्या नात्याने सर्वांना मदत करत राहणार आहे. आमचे नेते आमदार अनिलभाऊ बाबर देखील लोकांसाठी अहोरात्र झटत आहेत. तालुक्यातील सर्वच नेत्यांनी आपआपल्या परीने लोकांना मदत केली पाहिजे. लवकरच हे संकट देखील संपून जाईल.
              तानाजी पाटील,
              आटपाडी, शिवसेना नेते.
Post a comment

0 Comments