इस्लामपूरात पुन्हा लाॅकडाऊन, प्रशासनाचा कठोर निर्णय


इस्लामपूर ( हैबत पाटील)

      इस्लामपूर शहरात 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान तीन दिवस पुन्हा एकदा  लॉकडाऊन करण्यात येणार आहे तसेच इस्लामपूर व्यापारी असोशिएशनच्या वतीने दुकाने सहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत
         कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरात रविवार 23 ते  25 ऑगस्ट  पर्यन्त    लॉकडाऊन पाळण्यात येणार असून तीन दिवस  दिवस पूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत. पालिकेचे   पदाधिकारी व प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय व दुध सेवा ठराविक काळासाठी चालू ठेवण्यात येणार आहे .
       इस्लामपूर शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून खबरदारी म्हणून येत्या 23, 24, 25 रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. वाळवा तहसीलदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच बरोबर येथील प्रथित यश डॉकटर,  नगरसेवक कोरोनाने बाधित असून ते उपचार घेत आहेत
        इस्लामपूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरुवातीच्या काळात शहरात रुग्ण आढळून आले तेव्हा आपण सर्वांनी खबरदारी घेतली, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली. सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क वापरणे, जास्त संख्येने एकत्रित जमा न होणे या सर्व गोष्टींचा अवलंब करीत संख्या आटोक्यात आणली होती. आज पुन्हा एकदा आपण स्वतःची जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करीत आवश्यक असणारी खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन करत येथील व्यापारी असीसीएशनच्यावतीने  सराफ रेडीमेड व कापड व्यापारी असोसिएशन यांनी 6 दिवसा करीता दुकान बंद करण्याचा निर्णय मिटींग मध्ये घेतला आहे. शनिवार दिनांक 22/8/20 पासून गुरुवार 27/8/20 पर्यत दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे .
....................................................
चौकट :-
       तालुक्याबरोबरच इस्लामपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रविवार ते मंगळवार तीन दिवस पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या काळात केवळ वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी दिली.  शनिवार पासून गणेशोत्सव सुरु होत आहे. या काळातपुन्हा गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  तालुका प्रशासनाने तीन दिवस  लॉकडावूनचा निर्णय घेतला.

 

Post a comment

0 Comments