कुपवाडात लग्नाचा खर्च टाळून 55 हजार 555 रु. ची मदत


कुपवाड : येथील श्री केतन आणि सौ. वृषाली सरगर या नवदाम्पत्याने आपला विवाह संपन्न होताच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह विविध संस्थाना भेट देऊन मदतनिधीचे धनादेश सुपूर्द करत वैवाहिक जीवनाची सुरवात केली.

: कुपवाड मधील सरगर नवदांपत्याचे दातृत्व
 
कुपवाड ( प्रमोद अथणीकर)
           कुपवाड परिसरातील प्रभाग क्र. 8 मधील सिद्धनाथ कॉलनी मधील नवदांपत्याने लग्नाचा होणारा अनावश्यक खर्च टाळून सांगली महापालिकेच्या कोव्हीड सेंटरसह विविध सेवाभावी संस्थाना 55 हजार 555 रुपयांची मदत दिली आहे.
            कुपवाड येथील प्रभाग क्र 8 येथील सिद्धनाथ कॉलनी मधील केतन अशोक सरगर आणि वृषाली गुंडाप्पा ओलेकर यांचा विवाह निश्चित झाला होता. सामाजिक बांधिलकी जपत आपला विवाह अत्यंत साधेपणाने करण्याचे वधु वर पक्षाने निश्चित केले होते. त्यानुसार लग्नातील अनावश्यक खर्च टाळून त्यांनी महापालिकेच्या कोव्हीड सेंटरसह विविध सामाजिक संस्थाना मदतीचा हात देत समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे.
          केतन सरगर यांनी भगिनी निवेदिता प्रतिष्ठान मधील लहान अनाथ मुलींकरिता 11, 111 रुपये, महापालिका सांगली यांना कोविड 19 या हॉस्पिटल उभारणी करता 11, 111 रुपये , सांगली जिल्हा पोलीस कल्याण निधी 11, 111 रुपये , कुपवाड वृद्धाश्रमास 11, 111 रुपये व कन्यारत्न ठेव योजनेसाठी रुद्राणी फौंडेशन सांगली यांना 11,111/-रुपये असे त्यांनी पाच जणांना धनादेश देऊन एकूण 55 हजार 555 रु ची मदत करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे
        केतन सरगर यांनी आपले लग्न साध्या पद्धतीने केले असून केवळ 50 व्यक्तीच्या या उपस्थितीत सोशल डिस्टन्स राखून हा सोहळा पार पाडला. केतन हे न्यायालयात लिपिक या पदावर काम करतात तर वडील पिग्मी एजंट म्हणून काम करतात. या सामाजीक कार्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस व नगरसेवक विष्णू माने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.केतन यांच्या या सामाजिक उपक्रमांचे राज्यभरात कौतुक होत आहे. 

Post a comment

0 Comments