सांगली जिल्ह्यात आज 255 कोरोना पॉझिटिव्ह


सांगली ता. 9 प्रतिनिधी
         सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असून आज रविवार ता. 9 रोजी एकाच दिवशी 255 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 4706 इतका झाला आहे.
         सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी अजूनही आटोक्यात आली नसून विशेषता महापालिका क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. आज रविवारी सायंकाळपर्यंत महापालिका क्षेत्रात 172 रुग्णांची वाढ झाली असून यामध्ये सांगली शहरात 123 तर मिरज शहरात 49 रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी-2 दोन, जत-3, कडेगाव-1 कवठेमंकाळ-4, खानापूर-8, मिरज-28, पलूस-3 शिराळा-5, तासगाव-5, वाळवा-12 असे एकूण दिवसभरात 255 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
            त्यामुळे सांगली जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचे आकडा आता 4706 इतका झाला असून यामध्ये 2054 कोरोना मुक्त झाले आहेत. तर सध्या 2507 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात सांगली जिल्ह्यातील नऊ रुग्णांचा तसेच इचलकरंजी येथील 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 116 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या सांगली जिल्ह्यात पॉझिटिव रुग्णांपैकी 200 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments