डिग्रज परिसरातील 2 हजार लोकांना स्थलांतरित होण्याची सूचना


: जि. प. सदस्य विशाल चौगुले यांच्यासह मदत पथके सज्ज

मिरज (किरण पाटील)
          कोयना धरण पाणलोट क्षेत्रात असलेला संततधार पाऊस, कोयनेतील विसर्ग यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ आहे. नदीच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमधील जवळपास दोन हजार लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
           पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून मिरज पश्चिम भागातील नदीकाठी असणाऱ्या चारशे कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सूचना दिल्या आहेत. एकीकडे वाढत्या पाण्याची स्थिती आणि दुसरीकडे कोरोना रोगाचा प्रसार पाहता नागरिकांच्यात घबराट पसरली आहे. प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रणजित देसाई, मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, मंडल अधिकारी विजय तोडकर, तलाठी कुंडलिक रुपनर, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, मौजे डिग्रजच्या सरपंच गीतांजली ईरकर, ग्रापंचायत सदस्य, आपत्ती व्यवस्थापन समिती आदींनी पुरस्थितीची पाहणी केली. खबरदारीची उपाय योजना म्हणून कृष्णा बोट क्लब, श्रीजी बोट क्लब यांसह विविध बोट क्लब यांच्या माध्यमातून बोटी तयार ठेवल्या आहेत.

Post a comment

0 Comments