सांगली शहरात कंटेन्मेंट झोन वाढविले


सांगलीत 11 व मिरजेत दोन असे महापालिका क्षेत्रात 13 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सांगली, मिरजेत नव्याने कंटेन्मेंट झोन वाढविण्यात आले असून, तेथे जंतूनाशक फवारणी व प्रवेशबंदी करण्यात आली.   आतापर्यंत एकूण 33 ठिकाणी कंटेन्मेंट झोन झाले आहेत. सांगलीतील काळे प्लॉट, रोहिदास नगर आणि 100 फुटी रोडवरील एका रुग्णालयाशी संबधित महिला व पेठभागमधील तीन, कर्नाळ रस्त्यावरील पाच अशा 11 जणांचा, तर मिरजेतील पंढरपूर व मालगाव रस्त्यावरील प्रत्येकी एक अशा दोन महिलांचा यात समावेश आहे. 

आयुक्‍त नितीन कापडनीस यांच्यासह टीमने या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. सांगलीत शंभरफुटी हॉस्पिटल क्वारंटाईन केले होते. त्या हॉस्पिटलमधील एका 60 वर्षीय महिलेचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तिला तत्काळ कोरोना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. येथील रमामातानगर, काळे प्लॉट येथे राहणार्‍या एका 27 वर्षीय आरोग्य सेविकेला कोरोना झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले. त्यामुळे त्या भागात नव्याने कंटेन्मेंट झोन करण्यात आला. तिच्या संपर्कातील पती, मुलांना संस्था क्वारंटाईन करण्यात आले. 
गावभाग सिद्धार्थ परिसरातील रोहिदासनगरमध्ये एका 55 वर्षीय महिलेचा कोरोना अहवालही  पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला याच परिसरात राहात आहे. ती उत्तरप्रदेशात जावून आल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे रोहिदासनगर परिसरात मोठा कंटेन्मेंट झोन करण्यात आला. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, भाजप गटनेते युवराज बावेडकर, प्रभाग समिती सभापती उर्मिला बेलवलकर, उदय बेलवलकर, सुब्राव मद्रासी नगरसेवक फिरोज पठाण, रवींद्र वळवडे सहायक आयुक्त सावता खरात,  डॉ. शबाना लांडगे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments