कोल्हापूर : सोमवारपासून काय सुरू, काय बंद राहणार?

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दररोज उच्चांकी रुग्णसंख्येची भर पडत आहे. काल (ता.१७) शुक्रवारी आजपर्यंत सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळून आले असून हा आकडा २९३ एवढा आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सोमवारपासून (दि. 20) सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister Satej Patil)यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात केवळ दूध, वर्तमानपत्रे आणि औषध विक्रीलाच परवानगी असेल. अन्य सर्व दुकाने, व्यवहार बंद राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर जिल्ह्यातील बँका आणि शासकीय कार्यालयांबाबत आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून अध्यादेश जारी केला जाण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या सात दिवसांत (Kolhapur lockdown for 7 days)केवळ दूध, वर्तमानपत्र आणि औषध विक्रीला मुभा राहणार आहे. याव्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. नागरिकांना अत्यावश्यक कारणांखेरीज घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्यात सात दिवस कफ्यू सारखी परिस्थिती राहणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने याबाबत शनिवारी आदेश काढला जाणार आहे. यानंतरच आणखी कोणत्या सेवा सुरू राहतील हे स्पष्ट होणार आहे.

लॉकडाऊन काळात विनाकारण वावरणार्‍या वाहनधारकांसह सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) उल्लंघन करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरांतर्गत विविध मार्गांसह महामार्गावरही तपासणी नाके सुरू करण्यात येणार आहेत. कंटेन्मेंट झोन ठिकाणी रात्रंदिवस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दारूसह अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी शहरासह जिल्ह्यात पोलिस ठाण्यांतर्गत पथकेही नियुक्त करण्यात येत आहेत. लॉकडाऊन शंभर टक्के कडकडीत करण्यासाठी पोलिस यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.

Post a comment

0 Comments