विट्यात सुप्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागणविटा प्रतिनिधी :  विटा शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची  लागण झाली आहे. याबाबतचा रिपोर्ट नुकताच प्रशासनाच्या हाती आला आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी गेल्या पंधरा दिवसापासून खानापूर  तालुक्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे  सुरु होती. मात्र काल एकाच दिवशी रविवारी  विटा शहरात एक  आणि तालुक्यात एकूण सात रुग्ण आढळून आले. आज पुन्हा एकदा कोरोनाचा  विटा शहरात शिरकाव  झाला. शहरातील खानापूर रस्त्यावरील एका प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची  लागण झाल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. हे डॉक्टर आपल्या खासगी कामानिमित्त पुण्याला गेले होते. पुण्यातून आल्यानंतर ते होमकोरंटाईन होते.गेल्या काही दिवसापासून त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे 18 जुलै रोजी त्यांची टेस्ट घेण्यात आली. आज त्यांचा कोरोना  अहवाल पॉझिटिव आल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि लोखंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Post a comment

0 Comments