इंदिरानगर झोपडपट्टी वाद मिटला, सोमवारपासून टेस्ट



इंदिरानगरमधील नागरिकांची रॅपिड टेस्ट सोमवारपासून : मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि स्थानिक नागरिकात झालेल्या चर्चेत निर्णय: कंटेन्मेंट झोनही लहान करण्याच्या सूचना


        सांगली : इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये रॅपिड टेस्टमध्ये 23 रुग्ण सापडल्याने भयभीत झालेल्या इंदिरानगर वासीयांची आज मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अन्य नागरिकांच्या रॅपिड टेस्ट सोमवारपासून करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेवक बाळासाहेब सावंत आणि अभिजित भोसले उपस्थित होते.
    कंटेन्मेंट झोनवरून या परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी कंटेन्मेंट झोनचे पत्र पाडून आपला संताप व्यक्त केलाहोता. यानंतर सकाळी पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, सहायक आयुक्त सावता खरात पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, सहायक पोलिस निरीक्षक वर्धन यांच्यासह स्थानिक नागरिकांनी इंदिरानगरमध्ये फिरून सुधारित कंटेन्मेंट झोनचे नियोजन करीत ज्या भागात किंवा गल्लीत रुग्ण सापडला आहे तेथेच कंटेन्मेंट झोन करण्या बाबत सूचित केले. यावेळी स्थानिक 
            नगरसेवक बाळासाहेब सावंत आणि अभिजित भोसले उपस्थित होते. यानंतर दुपारी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनीही इंदिरानगर परिसराला भेट दिली. यावेळी आयुक्त कापडणीस यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करीत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रॅपिड टेस्ट आपल्या आणिआपल्या परिवार आणि समुदायासाठी किती महत्वाची आहे याची माहिती करून दिली. तसेच महापालिकेच्या टीमकडून केल्या जाणाऱ्या रॅपिड अँटिजेंन टेस्टला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. यावेळी स्थानिक नागरिकांनी सोमवारपासून टेस्ट घेण्यास काही हरकत नाही अशी ग्वाही आयुक्त कापडणीस यांना दिली. त्यामुळे सोमवारपासून दोन टीमकडून इंदिरानगरच्या कंटेन्मेंट झोनमधील 50 वर्षावरील नागरिकांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट आणि याचबरोबर आर्टिपीसीआर टेस्ट सुद्धा केल्या जाणार आहेत. याचबरोबर कोणीही नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आपली माहिती आमच्या वैद्यकीय टीमला द्यावी आणि हा रोग पसरण्यापासून रोखण्यास मदत करावी असे आवाहनही आयुक्त नीतीन कापडणीस यांनी केले. यावेळी 
            नगरसेवक बाळासाहेब सावंत आणि अभिजित भोसले , सहायक आयुक्त सावता खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ शीतल धनवडे, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, स्थानिक कार्यकर्ते शेखर मोहिते , भारत चौगुले , छगन चौगुले , समशेर चौगुले , रंधवा गायकवाड , राहुल घाडगे , संतोष जावीर , सिद्धू घाडगे , बंडू केंगार , जगु पुजारी , सुखदेव केंगार , बाबू वाघमारे , संजय हदिमनी आणि जावेद मदारी आदी उपस्थित होते..

Post a comment

0 Comments