सांगली जिल्ह्यात दुध आंदोलनास हिंसक वळण


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
: गोकुळ दुध संघाचा टँकर फोडला

इस्लामपूर , प्रतिनिधी:
       दूध दरासाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला सांगली जिल्ह्यात हिंसक वळण लागले आहे. पुणे-बंगलोर महामार्गावरील येलूर (ता.वाळवा) फाट्याजवळ स्वाभिमानी संघटनेने गोकुळ दूध संघाचा टँकर फोडून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले.
       स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात सकाळपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर फोडण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी गोरगरिबांना दुधाचे वाटप तसेच ग्रामदैवतांना दुग्धाभिषेक घालून आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळी सांगली जिल्ह्यातील येलूर फाट्याजवळ पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या टँकर अडवून फोडण्यात आला आणि हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतण्यात  आले. याप्रकरणी टँकर चालकाने कुरळप पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Post a comment

0 Comments