आकाडीला आला अन् पॉझिटिव्ह निघाला


विटा प्रतिनिधी
         कोरोनामुळे आषाढ महिन्यात होणाऱ्या आकाडी जत्रांचा  बेत बहुतांश  ठिकाणी रद्द  करण्यात आला होता. मात्र विटा शहरात आढळलेला  रुग्ण  खास आकाडी  जत्रेसाठी आठ दिवसा पूर्वी  विटा येथे  आला होता.  मात्र काल सोमवारी या रुग्णाला त्रास जाणवू लागल्यामुळे प्रथम विटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याला कोरोनाची लक्षणे असल्याने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मिरजेतील कोव्हीड रुग्णालयात पाठवले. आज त्या रुग्णाचा कोरोना अहवाल  पॉझिटिव आला आहे. ही व्यक्ती मूळची विट्यातील घुमटमाळ परिसरातील  असून सध्या अन्य गावात वास्तव्यास आहे. सालाबाद प्रमाणे आकाडीचा कार्यक्रम असल्याने ते आठ दिवसांपूर्वी विटा येथे आले होते. आकाडीचा बेत ठरल्याप्रमाणे झणझणीत  झाला.मात्र  काही दिवसातच या रुग्णाचा कोरोना अहवाल  पॉझिटिव आला, त्यामुळे आकाडीला उपस्थित असलेल्या लोकांना मात्र याचा ठसका सहन करावा लागणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Post a comment

0 Comments