सायलीची गरुडभरारी, आश्रमशाळेत शिक्षण घेत पटकावले ९४.६० गुण: आईवडिलांचे निधन, आजीला अर्धांगवायू तर चुलता अंध 
:अशा परिस्थितीत ' सायलीचे यश आभाळाएवढं 

पेठ ( रियाज मुल्ला )
    लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवले...चुलता अंध त्यामुळे आजीने सांभाळ केला. मात्र नियतीला ते सुध्दा बरं वाटलं नसावे...काही वर्षांपूर्वी आजीला अर्धांगवायु झाला आणि सायलीचे आयुष्य उघड्यावर पडलं...मग शेजारच्या लोकांनी तिला आश्रम शाळेत ठेवले... ज्या परिस्थितीच्या ठोकरा खात सायली शिक्षण घेत आली त्याच परिस्थितीला आज पायाखाली तुडवत सायलीने दहावीच्या परिक्षेत थोडेथोडके नव्हे तर चक्क ९४.६० टक्के गुण मिळवले आहेत.
        पेठ ता.वाळवा ,रा.भिमनगर येथील सायली अनिल पवार या जिद्दी आणि मेहनती मुलीची ही कहाणी. सायलीच्या लहाणपणीच आई-वडिलांच छञ हरपलं. घरची परिस्थिती हालाकिची, दारिद्रयात जीवन जगत असलेल्या आणि शासनाची तुटपुंजी पेन्शन व काबाडकष्ट करत आजीनं त्यांचा कसाबसा संभाळ केला. आजीचा पण दुसरा मिळकतीचा काही मार्ग नव्हता. सायलीला अथर्व नावाचा भाऊ व एक अंध चुलता आहेत. अथर्व आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. सायलीच्या शाळेचा खर्च आपल्याला पेलणार नाही पण तिचे शाळेचे , आयुष्यभराचे नुकसानही होऊ नये म्हणून आजीने आपल्या बुद्धिवान नातीला आष्ट्याला अण्णासाहेब डांगे माध्यमिक आश्रम शाळेत घालण्याचा निर्णय घेतला. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत , अपार मेहनत घेत, अभ्यास करुन दहावीच्या परीक्षेत सायलीनं दहावीच्या परिक्षेत ९४.६०% गुणमिळवित ,गरिबीचा आणि परिस्थीतीचा बाऊ न करता यश संपादन करण्यासाठी जिद्द,परिश्रम आणि चिकाटी लागते हे सायलीनं दाखवून दिलं आहे. 
        खरचं ती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची लेक आहे हे तिने सिद्ध करून दाखवलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिची आजी,, हिला अर्धांगवायू झाला असून ती सध्या पडून असते. पण याही परिस्थितीवर सायलीने मात केली. लहानपणीच आयुष्याच्या वाटेवर ओढवलेली वाईट परिस्थिती व अपयश या साऱ्याला न घाबरता, निराश, हताश न होता सर्व परिस्थितीवर मात करत सायलीनं जीवन कसं जगावं हे तिने केलेल्या सघर्षातुन दाखवुन आपल्या समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.Post a comment

1 Comments