खंडोबाचीवाडीत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह


पलूस, प्रतिनिधी
       भिलवडी परिसरामध्ये गेल्या आठवड्याभरापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ असतानाच आज दि.२९ जुलै रोजी खंडोबाचीवाडी येथील एका २१ वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. खंडोबाचीवाडी येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संख्येमध्ये भर पडली असून खंडोबाचीवाडी येथील कोरोना बाधित रुग्णाची संख्या २ झाली आहे.सदर युवक कोरोना बाधित असल्याचे समजताच पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ,भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग,भिलवडी चे तलाठी गौसमहंमद लांडगे,सर्कल अशोक लोहार यांनी तात्काळ खंडोबाचीवाडी येथे भेट दिली. कोरोना बाधित राहत असलेल्या परिसरामध्ये कन्टेनमेंट झोन तयार करण्यात आला असून ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्या वतीने तात्काळ संपूर्ण गावांमधून औषध फवारणी करण्यात आली आहे.
     यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने सदर कोरोना बाधित व्यक्तीच्या जवळील संपर्कातील व इतर संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे  काम सुरू करून सदर व्यक्तीच्या जवळील संपर्कातील २ व इतर संपर्कातील ८ व्यक्तींना होम  कॉरन्टाईन करण्यात आले यावेळी खंडोबाचीवाडी सरपंच महाबुब मुजावर, उपसरपंच संदीप माळी, ग्रामसेवक सौ.एस.ए.माने,पोलीस पाटील अधिक चेंडगे,माणिक तात्या माने,आरोग्य सेवक अमोल गुंडवाडे यांच्यासह आशा वर्कर उपस्थित होत्या.

Post a comment

0 Comments