Breaking News : खानापूर तालुक्यात कोरोनाची पुन्हा एन्ट्री

COVID19 positive cases mount to 346 in Meghalayaविटा ता. 19, कोरोना मुक्त झालेल्या खानापूर तालुक्यात आज रविवार ता. 19 रोजी कोरोनाने पुन्हा एकदा एंट्री मारली असून विटा शहर व परिसरात एकाच दिवशी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात खानापूर तालुका प्रशासनाला चांगले यश आले होते. कालच शनिवारी तालुक्यातील बाधितांपैकी शेवटचा रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आज रविवारी विटा शहरातील - १, वेजेगाव -३, मादळमुठी -१, जखिणवाडी-२ असे एकूण सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments