सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करावा : अॅड. अमित शिंदे

सांगली, प्रतिनिधी
     कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही हे जगात सगळीकडे सिद्ध झालेले आहे. जनतेसमोर असंख्य आर्थिक अडचणी निर्माण करणारा निरुपयोगी लॉक डाउन करताना हातावर पोट असणाऱ्यांना कसे जगायचे याचा प्रशासनाने विचार केलेला नाही त्यामुळे सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन तातडीने रद्द करावा अशी मागणी जिल्हा सुधार समितीचे अध्यक्षअॅड अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
            अॅड शिंदे म्हणाले, कोरोनाला थोपवण्याच्या उपाययोजना करण्यापेक्षा निरनिराळ्या गोष्टींतून पैसे कसे काढता येतील यावर प्रशासनाचे लक्ष आहे. सांगली प्रशासनाने कोणाला विश्वासात न घेता घोषित केलेल्या लॉकडाऊनला सांगली जिल्हा सुधार समितीचा तीव्र विरोध आहे. लॉकडाउनमुळे कोरोना नियंत्रणात येतो हा गैरसमज आहे. आपल्याला पुढील किमान एक वर्ष कोरोना सोबत जगायचे आहे. त्यासाठी एका वर्षाचा आराखडा तयार करत लोकांना या आजारासोबत जगण्याची सवय लावली पाहिजे. एक दिवस पोलिसांनी कडक कारवाई सुरू केल्यावर सर्वजन मास्क लावायला लागले हे आपण पाहिले आहे. बेशिस्तपणाला आळा घालता येऊ शकतो. फक्त आवाहन करून लोकांना शिस्त लागणार नाही. त्यासाठी कडक कारवाई करने आवश्यक आहे. आपल्या हातात असणाऱ्या उपाययोजना सोडून लॉक डाउन करणे म्हणजे जटिल प्रश्नांची सोपी उत्तरे देऊन प्रश्नापासून लांब पळण्याचा प्रकार आहे.
          लॉकडाउन करताना हातावर पोट असणाऱ्यांचा विचार केला का? सक्तीने घरात बसल्यावर व्यवसायावर व जनजीवनावर काय परिणाम होईल याचा विचार केला का? लॉक डाउन मुळे कोरोना नियंत्रणात येईल असे आजपर्यंतच्या अनुभवावरून दिसून येत नाही. त्यामुळे सांगली जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊनचा आदेश मागे घेऊन सर्व व्यवहार सुरळीत करावे, अशी मागणी जिल्हा सुधार समितीने
        यावेळी समिती सचिव रविंद्र काळोखे, उपाध्यक्ष जयंत जाधव, शहराध्यक्ष महालिंग हेगडे, संतोष शिंदे, सुधीर भोसले, प्रशांत साळुंखे, नितीन मिरजकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments