सांगलीत नवे 19 पॉझिटिव्ह


सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील  आणखी एक अधिपरिचारिका पुरुष (ब्रदर) पॉझिटिव्ह (corona patient in sangli)आला. रविवारी शिराळा तालुक्यातील 13 व्यक्‍ती, बावची (ता. वाळवा), बिळूर (ता. जत), पुणदी व दुधोंडी (ता. पलूस), वाघापूर (ता. तासगाव) येथील प्रत्येकी एक व्यक्‍ती पॉझिटिव्ह आली.


रविवारी नवे 19 पॉझिटिव्ह आले. रविवारी 5 व्यक्‍तींनी कोरोनावर मात केली. मिरज येथील शासकीय कोव्हिड रुग्णालयात 3 व्यक्‍तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रविवार अखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्‍तींची संख्या 358 झाली(corona patient in sangli) 
आहे. त्यापैकी 226 व्यक्‍तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 120 व्यक्‍ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी 3 व्यक्‍तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

रविवार अखेर एकूण मृत्यू झालेल्या व्यक्‍तींची संख्या 12 इतकी आहे, अशी माहिती  जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील 34 वर्षीय अधिपरिचारिका पुरुष याचा चाचणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. या बाधिताच्या संपर्कातील आणखी एक 31 वर्षीय अधिपरिचारिका पुरुष रविवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सांगली सिव्हिल हॉस्पिटल वर्तुळात धास्ती वाढली आहे. 

शिराळा तालुक्यात रविवारी नवीन 13 रुग्ण आढळले. त्यामध्ये शिराळे खुर्द येथील 9 व्यक्‍तींचा समावेश आहे. शिराळे खुर्द येथील 45 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुणी, 35 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, 16 वर्षीय मुलगा, 28 वर्षीय तरुण, 45 वर्षीय पुरुष आणि 87 वर्षीय वृद्ध यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. निगडी (ता. शिराळा) येथील 24 वर्षीय महिला, ढाणेवाडी (ता. शिराळा) येथील 60 वर्षीय पुरूष, कोकरूड (ता. शिराळा) येथील 30 वर्षीय महिला आणि 11 वर्षीय मुलगा यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. 

तालुकानिहाय आजअखेर पॉझिटिव्ह

आटपाडी-35, जत-20, कडेगाव- 25, कवठेमहांकाळ-13, खानापूर-19, मिरज-18, पलूस 18, शिराळा-125, तासगाव-14, वाळवा-51, महापालिका क्षेत्र- 20. 

Post a comment

0 Comments